थंड वातावरणात रेड वाईन पिण्यास अनेक जण प्राधान्य देतात. रेड वाईनला अनेक जण हेल्दी ड्रिंक मानतात. रेड वाईन ही हृदयासाठी देखील फायदेशीर मानली जाते. मात्र, याच्याशी संबंधित करण्यात आलेल्या एका संशोधनातून असे दिसून आले आहे की, रेड वाईन हे इतर अल्कोहोलिक ड्रिंक्सइतकेच धोकादायक असू शकते
रेड वाईन प्यायल्याने आपल्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते, होयं हे अगदी खरं आहे. रेड वाईनला काही जण चांगले मानतात. परंतु, याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून हे समोर आले आहे की, इतर अल्कोहोलिक ड्रिंक्सप्रमाणेच रेड वाईन देखील यकृतासाठी हानिकारक असू शकते. रेड वाईन प्यायल्याने फॅटी लिव्हर, डायबिटीज इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात.
या संशोधनानुसार, रेड वाईन प्यायल्यामुळे याचा सर्वाधिक परिणाम हा हृदयावर होऊ शकतो. तसेच, रेड वाईन प्यायल्यामुळे हृदयाजवळील रक्तवाहिन्यांच्या रिसेप्टर्सवर ही याचा परिणाम होतो. यामुळे, भविष्यात उच्च रक्तदाब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रेड वाईन असुदे किंवा कोणतेही अल्कोहोल याचे सेवन केल्याने तुमचे हार्मोनल संतुलन बिघडू शकते, असे ही या संशोधनातून समोर आले आहे. त्यासोबतच अल्कोहोल हे शरीरातील कॉर्टिसॉल स्ट्रेस हार्मोन्सवर परिणाम करते.
त्यामुळे, त्याचे प्रमाण वाढते. शिवाय, हृदयाचे ठोके देखील अचानक वाढतात. त्यामुळे, रेड वाईन किंवा कोणतेही अल्कोहोल जरी असले तरी त्याचे सेवन करणे टाळा. यामुळे, आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
ठाण्यातील रेव्ह पार्टी उधळली! एमडी, चरस, गांजासह अंमली पदार्थांचा वापर, 100 जणांवर कारवाई
Discussion about this post